गर्भपिशवीमध्ये असलेल्या छोट्या fibroid (गाठीमुळे बाळ होण्यात आलेली अडचण) व अत्याधुनिक आय.व्ही. एफ. तंत्रज्ञान वापरून झालेलं बाळ!
- Santati Fertility Center
- 16 August 2021
मी विनया. लग्नाला ८ वर्षे झाली. मी एका उच्च कंपनीमध्ये चांगल्या पोस्टवर जॉब करते. त्यामुळे कामाचा बराच त्रास असायचा. अवेळी जेवण, रात्री-अपरात्री घरून देखील काम करणे. झोप पूर्ण न होणे, वारंवार ऑफिसमध्ये चहा, कॉफी पित राहणे शक्यतो घराबाहेरील जेवण म्हणजेच fast food खायची खूपच सवय लागली होती. परिणामी माझे वजन तर वाढत होतेच व त्यात भर म्हणजे पाळीदेखील अनियमित होत चालली होती. लग्नानंतर देखील अनियमित पाळीमुळे सासूकडून बरेच टोमणे ऐकावे लागत होते. पाळी आली नाही तर बाळ कसं होणारं? हे शब्द कानावर पडत होते. मला देखील आता काळजी वाटू लागली होती. बघता बघता लग्नाला ६ वर्षे होऊन गेली. आता मात्र आपण बाळासाठी ट्रीटमेंट घ्यावी असे मी ठरवले.
नेट वर शोधून एका प्रख्यात स्त्रीरोगतज्ञांची मी अपॉइंटमेंट घेतली. तिथे गेल्यावर माझी सर्व तपासणी करण्यात आली. तेथील डॉक्टरांनी औषध देताच ३ ते ४ महिन्यानंतर मला गर्भधारणा झाली. पण अवघ्या काही आठवड्यातच माझा गर्भपात झाला. मी खूप दुःखी झाले. आता पुढे काय करावे, काहीच सुचत नव्हते. शेवटी माझ्या ऑफिसमधील मैत्रिणीने मला संतती हॉस्पिटल मध्ये जाऊन येण्याचा सल्ला दिला. दुसऱ्याच दिवशी मी व माझे मिस्टर संतती हॉस्पिटल मध्ये येऊन डॉ. स्वाती डोंगरे मॅडम यांना भेटलो. त्यांना आधी झालेल्या गर्भपाताबद्दल सांगितले. संपूर्ण माहिती घेतल्यावर डॉ. स्वाती डोंगरे मॅडमनी काही रक्ताचे तपास आणि सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला. रक्त तपास तर नॉर्मल होते पण सोनोग्राफीमध्ये गर्भपिशवीत गाठ असल्याचे आढळून आले. की जी गाठ बाळाच्या वाढीमध्ये अडथळा आणून गर्भपात होण्यास कारणीभूत होती.
डॉ.स्वाती डोंगरे मॅडमनी HYSTEROSCOPY करून गाठ काढून टाकण्याचा सल्ला दिला. अगदी काही दिवसातच ह्या छोट्या OPERATION द्वारे गाठ काढून टाकण्यात आली. व पुढील ३-४ महिन्यानंतर औषध गोळ्यांच्या ट्रीटमेंट ने मला नैसर्गिकरित्या PREGNANCY राहिली. व काहीच अडचण न येता नऊ महिने झाल्यावर मी एका गोंडस बाळाला जन्म दिला.
डॉ. स्वाती डोंगरे ह्या उत्तम डॉक्टर आहे. त्यांची ट्रीटमेंट करण्याची पद्धत अगदी वेगळी व छान आहे. आम्हाला दिलेल्या उत्कृष्ट ट्रीटमेंटबद्दल मी त्यांची आभारी आहे.