Our Centers

Blog Details

THIN ENDOMETRIUM व तीन वेळा IVF अयशस्वी झाल्यामुळे सोडलेली आशा व त्यावर मात करून मला झालेलं बाळ !

 

                मी साक्षी वय वर्षे ३४ लग्नाला ८ वर्षे झालीत. लग्नानंतर मला PCOD चा त्रास जाणवायला लागला. पाळी वेळच्यावेळी न येणे,वजन वाढत जात होते,त्वचा काळवंडली होती, केस गळत होते. ह्या सगळ्याचं फार TENSION घेऊन मला BP चा त्रास देखील झाला.  या सगळ्यांमध्ये मला नैसर्गिक PREGNANCY काही राहत नव्हती. शेवटी बाळासाठी योग्य TREATMENT घ्यावी असं ठरलं. एका नावाजलेल्या डॉक्टरकडे आमची TREATMENT सुरु झाली. तिथेही काही विशेष फरक जाणवेना. शेवटी तुम्हाला IVF शिवाय पर्याय नाही असे सांगण्यात आले.

               ठरल्याप्रमाणे IVF द्वारा बाळ सोडण्यात आले. पण बाळ काही गर्भाशयात टिकत नव्हते.या सगळ्यातून मी मात्र मनातून खचत चालले होते. ३ वेळा IVF करूनही प्रत्येक वेळा निराशाच पदरी पडली. शेवटी अगदी शेवटचा पर्याय म्हणून डॉक्टरांनी मला सरोगसी करायला सुचवले.पण माझे मन काही केल्या त्या गोष्टीला मान्य नव्हते. दिवसामागून दिवस चालले होते. आता मात्र मी सर्वच TREATMENT बंद केली होती. एकदा असंच बोलताना माझ्या मैत्रिणीने मला संतती फर्टीलिटी IVF सेंटर बद्दल सांगितले. शेवटचा पर्याय म्हणून एकदा जाऊन यावे असे मी ठरवले. डॉ.स्वाती डोंगरे यांच्या सकारत्मक बोलण्याने माझा हुरूप खूपच वाढला व मी पुन्हा TREATMENT चालू करावी असा निर्णय घेतला. औषध उपचारांनी डॉ. स्वाती मॅडम यांनी माझ्या BP चा त्रास अगदी CONTROL मध्ये आणला. व त्यानंतर योग्य TREATMENT करून EMBRYO TRANSFER करण्यात आलं. सर्व काही योग्य प्रकारे TREATMENT करून मला जुळी बाळ झाली आहेत. माझी दोन्ही मुलं सुदृढ, निरोगी व हुशार आहेत.

           मला माझ्या कुटुंबाला आनंद देणाऱ्या डॉ. स्वाती मॅडम यांची मी मनापासून आभार मानते.

 

                                                                                                                                                शब्दांकन: डॉ. क्लिटा परेरा