Our Centers

Blog Details

Asherman’s Syndrome, Tuberculosis/ TB चा जुना आजार असल्याने बाळ होण्यात येणारी अडचण व अत्याधुनिक आय. व्ही. एफ. तंत्रज्ञान वापरून झालेलं बाळ !!

              वयाच्या १९ व्या वर्षी मला दुर्दैवाने टीबी चा आजार झाला होता. टीबी हे भयानक नाव ऐकूनच मी व माझ्या घरचे सगळेच घाबरून गेलो होतो. एवढ्या कमी वयात झालेल्या ह्या आजाराने मला पुढे काही त्रास होईल का ? काहीच समजत नव्हते. परंतु आमच्या फॅमिली डॉक्टरांनी माझ्यावर योग्य उपचार करून माझा टीबी चा आजार पूर्ण बरा केला. आता घरातून माझ्या लग्नाची लगबग चालू झाली होती. परंतु मला मात्र पूर्वीच्या टीबी च्या आजारपणाची अजूनही मनात भीती वाटत होती. ह्या आजारपणामुळे पुढे जाऊन मला बाळ राहायला त्रास होईल का ? ह्या काळजीने मी अगदी त्रस्त झाले होते. परंतु आईवडिलांचे मन दुखवले जाऊ नये म्हणून त्यांनी सुचवलेल्या  मुलाशी माझे लग्न झाले. आता मला पूर्वीचा कोणताही त्रास जाणवत नव्हता व मी आता पूर्णपणे निरोगी आहे. अशी माझी खात्री पटली होती.
              दिवसांमागुन दिवस जात होते. सर्व काही सुरळीत चालले होते. पहिली ३-४ वर्षे बाळ नैसर्गिकरीत्या होईल ह्या आशेवर निघून गेली. पण त्यात काही यश आले नाही. आता मात्र माझी दिवसेंदिवस काळजी वाढत चालली होती. माझ्या लग्नाआधीच्या ह्या आजारपणाची कल्पना माझ्या पतीला देखील नव्हती. माझ्या ह्याच पूर्वीच्या आजारपणामुळे बाळ होत नसावे असे मला मनोमनी वाटत होते. परंतु सासरच्या लोकांना हे कसे सांगावे?? त्याचा काय परिणाम होईल ह्याची खूप भीती मनात होती. परंतु धीर एकत्र करून मी सर्वकाही माझ्या पतीला सांगितले. हे सर्व ऐकताच ह्यांचे माझ्याबद्दलचे पूर्ण मतच बदलून गेले. आता मात्र प्रत्येक महिन्याला तुझ्याचमुळे बाळ होत नाहीये हा टोमणा ऐकू येत होता. माझ्यामुळे माझ्या पतीलादेखील वडील बनण्याचं सुख नाही भेटत आहे.त्याचं प्रत्येक क्षणी मनात दुःख  वाटत होते. कशातच माझे मन रमत नव्हते. सर्व काही असून देखील सारखी अपराधी पणाची भावना मनात सतवत होती. पाहुणे, मित्रमंडळी यांपैकी कोणालाही भेटणे मला नकोसे वाटत होते. कारण प्रत्येकवेळी बाळासाठी टोमणे ऐकून ऐकून मी दिवसेंदिवस खचत चालले होते.
             आमच्या लग्नाला आता ७ वर्षे उलटली होती. आता मात्र काहीतरी ट्रीटमेंट घ्यावीच लागणार असे मला वाटू लागले होते. शेवटी पतीशी बोलून आपण बाळासाठी ट्रीटमेंट करू असे आम्ही ठरवले. ट्रीटमेंट साठी चांगल्या डॉक्टरांचा शोध घेत असताना आम्हांला डॉ. स्वाती डोंगरे मॅडम यांच्याबद्दल समजले. अजिबात वेळ वाया न घालवता ट्रीटमेंट साठी आम्ही संतती फर्टीलिटी व आय. व्ही. एफ. सेंटरमध्ये पोहोचलो. येथे आल्यावर डॉ. स्वाती डोंगरे मॅडमना मी पूर्ण माझ्या आजाराची माहिती दिली. मॅडमनी माझी HYSTEROSCOPY केली. त्यामुळे माझ्या पिशवीच्या आत जुन्या टीबी च्या आजारामुळे असलेले बरेच ASHERMAN'S  SYNDROME चे ADHESIONS  असल्याचे सांगितले. त्यांनी ते CUT करून माझी पिशवी मोठी केली. माझ्या गर्भपिशवीच्या आतील थर देखील पातळ असल्याने बाळ राहण्यासाठी डॉक्टरांनी मला ३ महिने  औषधांचा कोर्स पूर्ण करण्यास सांगितले.. ३ महिने व्यवस्थित औषधे घेतल्यावर पुन्हा सोनोग्राफी करण्यात आली. आता मात्र गर्भपिशवीतील मासिक पाळीचा थर योग्य झाला होता. अगदी दुसऱ्याच महिन्यापासून IVF ट्रेंटमेन्टसाठी सुरुवात झाली. व IVF तंत्रज्ञान वापरून माझ्या गर्भपिशवीत बाळ सोडण्यात आले. 
              डॉ. स्वाती डोंगरे मॅडम व त्यांच्या टीमच्या अथक प्रयत्नांमुळे मी माझ्या स्वतःच्या बाळाची आई बनले. बाळाच्या येण्याने सर्वच जण आनंदी झाले आहेत. माझ्या आयुष्यातील अवर्णनीय आनंद पसरवणाऱ्या डॉ. स्वाती डोंगरे मॅडम व टीम यांची मी आभारी आहे.   
                
     
                                                                                                                                                                                        शब्दांकन : डॉ. क्लिटा परेरा.