गर्भपिशवीला पडदा / BICORNUATE UTERUS मुळे बाळ होण्यात येणाऱ्या अडचणी व अत्याधुनिक IVF तंत्रज्ञान वापरून झालेलं बाळ!
- Santati Fertility Center
- 31 July 2021
लग्नानंतर प्रत्येक जोडपं हे आपल्या बाळाची स्वप्ने रंगवत असतात. आम्ही देखील अशीच स्वप्ने रंगवत होतो. पण हि स्वप्ने लग्नानंतर ३-४ वर्षापर्यंत ठीक वाटत होती. पण ह्या ३-४ वर्षात बाळ न राहिल्यामुळे आता मात्र आमची चिंता दिवसेंदिवस वाढत चालली होती. आमचे वय देखील वाढत चालले होते. आता आपण बाळासाठी योग्य उपचार घेऊ असे आम्ही ठरवले.
ठरल्याप्रमाणे आम्ही प्रख्यात स्त्रीरोगतज्ञांची भेट घेतली. त्यांनी आमचे काही रिपोर्ट्स केले. व सर्वकाही नॉर्मल असल्याचे आम्हाला सांगितले. आता आम्हीदेखील अगदी निवांत झालो. सगळं काही नॉर्मल आहे म्हणजे आपल्याला नक्कीच लवकर बाळ होईल अशा आशेवर आम्ही होतो. आता आमची कोणतीही ट्रीटमेंट चालू नव्हती. दिवसांमागुन दिवस जात होते. आता अजून २-३ वर्षे उलटली होती. पण परिणाम काहीच जाणवत नव्हता. आता मात्र आपण योग्य ट्रीटमेंट घ्याचीच असा आम्ही निर्णय घेतला.
आमच्या एका नातेवाईकांना संतती टेस्टट्युब बेबी व फर्टीलिटी सेंटरमध्ये चांगला RESULT मिळाला हे आम्ही ऐकून होतो. त्यामुळे आपणदेखील येथेच ट्रीटमेंट घ्यावी असे आम्ही ठरवले.आमच्याकडे पूर्वी केलेले सर्व रिपोर्ट घेऊन आम्ही संतती फर्टीलिटी सेंटर मध्ये पोहोचलो. बाहेरच असलेले असंख्य बाळांचे फोटो पाहून मन फार प्रसन्न झाले. सर्व काही सकारत्मक वाटू लागले. शेवटी बराच वेळ वाट पाहिल्यावर डॉक्टरांना भेटायची वेळ आली. अगदी नातेवाईकांनी सांगितल्याप्रमाणेच प्रसन्न, मनमिळावू, प्रेमळ अशा डॉ.स्वाती डोंगरे मॅडमना भेटूनच खूप छान वाटलं. त्यांना आम्ही सर्व अडचण सांगितली. मॅडमनी आम्हला सर्व काही समजावून सांगून अजून काही तपास करावे लागतील असे सांगितले. रक्ताचे तपास नॉर्मल होते. तरीही बाळ राहत नसल्याने मॅडमनी आम्हला गर्भपिशवीची आतून तपासणी म्हणजेच HYSTEROSCOPY करावी लागेल असे सांगितले. ठरल्याप्रमाणे HYSTEROSCOPY करण्यात आली. त्यामध्ये माझ्या गर्भपिशवीला पडदा असल्याचे सांगितले. त्यामुळे बाळ राहत नव्हते. व त्याच वेळी मॅडमनी छोटसं OPERATION करून तो पडदा कापून गर्भपिशवी योग्य आकाराची बनवली. त्यानंतर औषध गोळ्यांनी गर्भाशयातील वातावरण उत्तम बनवले. सर्व काही छान झाल्यावर IVF तंत्रज्ञान वापरून माझ्या गर्भाशयात बाळ सोडण्यात आले.
माझ्या गर्भावस्तेथदेखील मला उत्तम मार्गदर्शन व उपचार केले. व त्यामुळे माझी गर्भावस्था अगदी सुखकर बनली. माझे ९ महिने पूर्ण झाल्यावर माझी नॉर्मल डिलिव्हरी करण्यात आली. आता मला १० महिन्यांचा मुलगा आहे. बाळाच्या येण्याने आम्ही सगळेच खूप आनंदी आहोत. आमच्या घरात आनंद पसरवणाऱ्या डॉ.स्वाती डोंगरे मॅडम व त्यांच्या टीमची मी आभारी आहे.
शब्दांकनः डॉ. क्लिटा परेरा.