वारंवार IVF FAIL झाल्यामुळे झालेली निराशा व संतती फर्टीलिटी येथे उपचार करून झालेले बाळ!
- Santati Fertility Center
- 28 July 2021
मी पूनम, एका नामांकित IT कंपनी मध्ये जॉब करते. ८ वर्षांपूर्वी ऑफिस मधील कलिग असलेल्या आकाश व माझं लग्न झालं. आम्ही दोघेही जवळपास समान वयाचे. शिक्षण ,नोकरी यामध्ये लग्नापर्यंत आमचे वय ३५ वर्ष झाले होते . लग्नानंतर मात्र आम्ही FAMILY PLANNING बिलकुल करायचे नाही असा निर्णय घेतला. ४-५ वर्षे नैसर्गिकरित्या बाळ होईल यात निघून गेली. पण तो पर्यंत आमचे वय चाळीशीच्या घरात जाऊन पोहोचले. आता मात्र ट्रीटमेंट घ्यावीच लागणार असे आम्ही ठरवले.
ठरल्याप्रमाणे एका प्रख्यात स्त्रीरोगतज्ञांची आम्ही भेट घेतली. त्यांनी सर्व रिपोर्ट्स केल्यावर आम्हाला सांगितले. वयाप्रमाणे माझ्या शरीरातील अंडयांची संख्या आता कमी होत चालली होती. व माझ्या पतीचे शुक्रजंतूदेखील नैसर्गिक गर्भधारणेसाठी पाहिजेत त्यापेक्षा कमी होते. एक तर वाढतं वय व त्यात असलेल्या शारीरिक अडचणीमुळें त्या डॉक्टरांनी आम्हांला IVF करण्याचा सल्ला दिला. आम्ही देखील हाच पर्याय आमच्यासाठी योग्य आहे हे जाणून IVF करण्याचा निर्णय घेतला.ठरल्याप्रमाणे IVF ची पूर्ण प्रक्रिया करण्यात आली. आता आम्ही खूप आनंदी होतो. IVF झाल्यानंतर मी डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे सर्व पथ्य व आहार सगळं पाळत होते. डॉक्टरांनी बोलवलेल्या दिवशी PREGNANCY TEST करण्यासाठी अगदी उत्साहाने आम्ही पोहोचलो. डॉक्टरांनी माझी PREGNANCY TEST केली. परंतु माझ्या दुर्दैवाने ती NEGATIVE आली होती. मन खूप दुःखी झालं होत, असे का झाले असेल ? काहीच समजत नव्हते. काही महिने पुन्हा औषधोपचार करून पुन्हा माझ्या गर्भाशयात बाळ सोडण्यात आले. आता मात्र आम्ही आधीपेक्षा जास्त खबरदारी घेत होतो परंतु का कुणास ठाऊक प्रत्येक वेळी पदरी निराशाच होती. वारंवार IVF FAIL झाल्यामुळे आम्ही आई-वडील बनण्याची आशाच सोडून दिली होती.
परंतु एकदा माझ्या मैत्रिणीकडून मला संतती टेस्टट्युब बेबी व फर्टीलिटी सेंटरबद्दल समजले. शेवटचा पर्याय म्हणून जाऊन यावे असे आम्ही दोघांनी ठरवले.ठरल्याप्रमाणे आम्ही संतती टेस्टट्युब बेबी व फर्टीलिटी सेंटर मध्ये पोहोचलो. येथे डॉ.स्वाती डोंगरे मॅडमना सर्व घडलेला प्रकार सांगितला व रिपोर्ट्स देखील दाखवले. त्यांनी सर्व रिपोर्ट्स पाहून आपल्याला अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरावे लागेल असे सांगितले. त्यासाठी त्यांनी ERA नावाचा रिपोर्ट करून बाळ सोडण्याची योग्य वेळ शोधून काढली. व त्याप्रमाणे IVF करण्यात आले. आणि काय आश्चर्य!! अगदी पहिल्या वेळेतच आमचं IVF यशस्वी झाले. PREGNANCY मध्ये देखील उत्तम मार्गदर्शन व औषधोपचार ह्यांमुळे माझी गर्भावस्था एकदम सुखकर बनली.
आता मला नऊ महिन्याची TWINS BABY GIRLS आहेत. बाळाच्या येण्याने घर आनंदाने भरून गेलं आहे. डॉ.स्वाती डोंगरे मॅडमनी केलेल्या BEST TREATMENT साठी मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानते.
शब्दांकन : डॉ. क्लिटा परेरा