पाळी अनियमित असल्याने बाळ होण्यात येणाऱ्या अडचणी व संतती फर्टीलिटी सेंटर येथे उपचार करून झालेलं बाळ !!!
- Santati Fertility Center
- 22 July 2021
मी कधी आई बनू शकेल का ? माझी पाळी कधी नीट सुरु होईल? अजून किती ट्रीटमेंट करावी लागेल मला ? कधी ह्या गोळ्या औषधांमधून माझी सुटका होऊन मला स्वतःच बाळ होईल ? मी मानसी वय ३५ वर्षे. वयाच्या १६ वर्षांपासून पाळी सुरु झाली. परंतु प्रत्येक वेळी पाळी अनियमितच यायची. लग्नापूर्वी ह्या गोष्टीची मला फार काही काळजी वाटत नव्हती. ६ वर्षांपूर्वी माझे लग्न झाले. आता मात्र मला थोडी चिंता वाटू लागली होती. कारण माझी पाळी नियमित नाही आली तर मला बाळ होईल का ? ना ना प्रश्न मनात होते. त्यामुळे पूर्वीपासूनच फॅमिली planning करायचे नाही असे मी ठरवले होते. अगदी लग्नाला १ वर्ष होताच मी स्त्रीरोगतज्ञांकडे माझी ट्रीटमेंट सुरु केली होती. सर्व औषध गोळ्या चालू होत्या. रिपोर्ट देखील सर्व केले होते. त्यात काहीच प्रॉब्लेम नव्हता. तरीही पाळी नियमित येत नव्हती. दर महिन्याला पाळी येण्याची औषध मला दिली जात होती तेव्हाच पाळी यायची. एक महिना जरी औषध नाही घेतली कि पुन्हा बंदच!!
सारखी औषध गोळ्या खाऊन मला खूप शारीरिक त्रास देखील होत होता पण माझ्याकडे काहीच पर्याय नव्हता. जवळ जवळ ५ वर्षे हे सर्व असचं चाललं होतं. आता मात्र मी खूप त्रासले होते. सारख्या औषध गोळ्या घेणे आता नकोसे वाटत होते. ह्या सर्वात आर्थिक व मानसिक त्रास देखील वादात चालला होता. अखेर मला संतती टेस्टट्युब बेबी व फर्टीलिटीसेंटर बद्दल समजले. बाकीची सर्व ट्रीटमेंट मी बंद करून तिथे गेले. संतती टेस्टट्यूब बेबी व फर्टीलिटी सेंटर येथे पोहचताच भिंतीवर असलेले असंख्य बाळांचे फोटो पाहून खूपच सकारत्मक वाटले. व आपण येथेच ट्रीटमेंट करू असे मी मनातच ठरवून टाकले. येथील सर्व स्टाफ फारच मनमिळावू व helpful वाटला. शेवटी आम्ही दोघेही डॉ. स्वाती डोंगरे मॅडमना भेटलो. त्यांचा प्रसन्न व हसरा चेहरा पाहूनच आमच्यात बरीच पॉसिटीव्ह energy आली.
डॉ. स्वाती मॅडम यांनी माझी अडचण समजून घेतली. व मला naturally बाळ कसं राहतं? व IVF म्हणजे काय ? हे अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितलं. व आम्ही IVF ला जायचं असा निर्णय घेतला . ठरल्याप्रमाणे आमची IVF ट्रीटमेंट करण्यात आली. अगदी २-३ महिन्यामध्ये IVF करून बाळ माझ्या गर्भाशयात सोडण्यात आले. PREGNANCY मध्येही मला फार त्रास झाला नाही. आता माझा मुलगा ८ महिन्याचा आहे. माझी उत्तम ट्रीटमेंट करणाऱ्या डॉ. स्वाती डोंगरे मॅडम व त्याची संपूर्ण टीम यांची मी आभारी आहे.
शब्दांकनः डॉ. क्लिटा परेरा.