Our Centers

Blog Details

वयाच्या ५० व्या वर्षी दगावलेलं बाळ आणि सोडलेली आशा!!

           ती अघोर सायंकाळ !!आमचा संपूर्ण आयुष्य उद्धवस्त करून टाकणारी ठरेल. असं स्वप्नात देखील वाटलं नव्हतं, संध्याकाळचे ६ वाजले होते. डोळे रस्त्यावर वारंवार लागले होते. माझ्या घरात व बाहेर येरझाऱ्या सुरु झाल्या होत्या.रोज ४ वाजता कॉलेज मधून परतणारा माझा लाडका समीर अजून घरी परतला नव्हता. कुठे गेला असेल ?अजून का आला नसेल ?काही सुचतच नव्हतं. त्याच्या २-३ मित्रांना फोन करून विचारलं तेव्हा त्याचे मित्र बोलले कि तो तर कधीच कॉलेजमधून निघालाय. प्रत्येक क्षण तासासारखा भासत होता.काय करावं काहीचं सुचतं नव्हतं .

           अचानक घरातील फोनची रिंग झाली .मी धावतच फोन जवळ गेले. समोरून अनोळखी व्यक्तीचा आवाज आला. तुम्ही समीरच्या कोण ?मला त्याच्या पाकिटात काही ID व हा नंबर सापडला आहे. मी म्हणाले, मी समीरची आई बोलतेय!!! कुठे आहे तो ?त्याला फोन द्याना !मी फार घाबरीघुबरी होऊन म्हणाले. समोरून पुन्हा आवाज आला. काकू तुमच्या मुलाचा बाईक वरून येताना खूप मोठा अपघात झाला आहे.त्यावेळी आम्ही तिथे होतो व त्याला आम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊन आलोय !!

        काय ? माझ्या तोंडातून किंचाळी बाहेर पडली .२ मिनीटं माझ हृदयचं बंद पडल्याचा आभास मला झाला . त्या मुलाने समोरून हॉस्पिटलचे नाव व पत्ता सांगितलं. माझं डोकं बधीर झालं होतं. डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. मी कसंबसं समीरच्या बाबांना कॉल केला. व घडलेला सर्व प्रकार सांगितला. ते देखील हॉस्पिटलमध्ये यायला निघाले. आम्ही दोघंही हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. मला कॉल केलेला तो देवमाणूस असलेला मुलगा बाहेरच आमची वाट बघत होता. आमची ओळख पटवून आम्ही तिघंही धावतच समीर जिथे होता त्या ICU कक्षेच्या बाहेर पोहोचलो.माझं बाळ कसं असेल ? किती लागलं असेल काही समजत नव्हतं काही मिनिटांतच डॉक्टर आतून बाहेर आले. आता मात्र माझा बांधच फुटला. डॉक्टर कसं आहे माझं बाळ ?मी रडत रडतच विचारले. डॉक्टरानीं आम्हांला त्यांच्या केबिनमध्ये येण्यास सांगितले. डॉक्टर काय सांगतायत याकडे आमचं लक्ष लागलं होतं. डॉक्टर बोलांना काहीतरी !! कसं आहे माझं बाळ ? जास्त लागलं तर नाही ना त्याला ? ताई तुम्ही थोड्या शांत व्हा! आम्हला सांगायला खूप दुःख होतय पण अपघातात समीरच्या डोक्यला गंभीर इजा झाली व त्याला आम्ही नाही वाचवू शकलो. आम्ही दोघंही पूर्ण पणे कोलमंडून गेलो ,काय बोलावं ? काय झालंय ? काहीच कळेना, दोघेही डॉक्टरांच्या पुढ्यात फक्त आक्रोश करत होतो. डॉक्टर काही तरी करा माझ्या बाळाला वाचवा.पण ते शक्य नव्हते !! का नियती आमच्यासोबत एवढी क्रुर बनली होती? आमचं पूर्ण आयुष्य उध्वस्त झालं होतं.

         दिवसांमागून दिवस जात होते . मन अजूनही हे दुःख पचवायला तयार नव्हतं. आमच्या दोघांची प्रकृती देखील दिवसेंदिवस खालावत चालली होती. हा हा म्हणता म्हणता ह्या गोष्टीला वर्ष उलटलं. समीरचे बाबा ऑफिसला गेल्यावर मी अजूनच एकटी व्हायचे. खचून जात होते. मला काहीही करून माझा समीर पुन्हा हवा होता. ''देवा काही तरी चमत्कार कर व माझ्या बाळाला माझ्याकडे पुन्हा पाठव.'' प्रत्येक क्षणी मनोमनी हेच मागत होते. पुन्हा एकदा बाळाचा chance घ्यावा असा मनात विचार आला. पण हे कसं शक्य ? माझं वय आता ५० वर्ष झालंय. ४-५वर्षांपूर्वी पाळीदेखील बंद झालीय. मनात अशी विचार चक्र फिरतच होती. नाही आता हे काही होणार नाही अशी मनाची तयारी करून आम्ही सर्वच आशा सोडली.

           असंच एकदा मैत्रिणीकडून संतती फर्टीलिटी व IVF सेंटरबद्दल समजलं. मैत्रिणी कडून खूप सकारत्मक गोष्टी ऐकायला मिळाल्यावर, आपणदेखील एकदा जाऊन येऊ असा हट्ट मी मिस्टरांजवळ धरला. आम्ही दोघंही ठरल्याप्रमाणे संतती फर्टीलिटी व IVF सेंटरमध्ये दाखल झालो. येथील सर्वच स्टाफ मन मिळावू वाटला . शेवटी डॉ. स्वाती डोंगरे मॅडम यांना आम्ही भेटलो. माझ्यासोबत घडलेला संपूर्ण प्रसंग मी त्यांना सांगितला. त्यांनी अगदी आपुलकी ने व मायेने मला खूप आधार दिला. सुनीता तू काळजी नको करु आपण नक्कीच तुझ्यासाठी प्रयत्न करू. त्यांच्या सकारत्मक बोलण्याने माझा हुरूप वाढला. औषध गोळ्यांनी माझी बंद झालेली मासिक पाळी पुन्हा सुरु केली. वेगवेगळे तपास औषधोपचारणांमध्ये कसलेही कसर न सोडता अगदी काही महिन्यांतच IVF तंत्रज्ञानाद्वारे माझ्या गर्भाशयात बाळ सोडण्यात आले. त्यानंतरही नऊ महिने त्यांनी मला शारीरिक व मानसिक आधार देत माझी गर्भावस्था खूपच सुखकर बनवली. ठरल्याप्रमाणे पाडव्याच्या शुभ मूहुर्तावर ऑपरेशन द्वारे माझी डिलिव्हरी करण्यात आली. मी पुन्हा एकदा एका गोंडस बाळाची ''आई'' झाले. बाळाला हातात घेताच डोळ्यांतून आनंदाश्रू काही थांबेनात. मला मुलगा झाला होता. मॅडमकडे बघून मी एकच वाक्य बोलू शकले. मॅडम माझ्या समीरला तुम्ही परत आणलंत. तुम्ही माझ्यासाठी देवमाणूस आहात. पुढे काय बोलू शब्दच नव्हते. कितीतरी वर्षांनी मी पुन्हा एकदा मनापासून हसले होते. ह्यापेक्षा आनंदाचा दिवस माझ्या आयुष्यातील कोणताच नसावा.

            किती आभार मानू डॉ.स्वाती मॅडम यांचे ? माझं जवळजवळ संपलेलं आयुष्य पुन्हा एकदा डॉ. स्वाती मॅडम यांनी बहरून टाकलं होतं. आमच्या छोट्या बाळाचं नाव सुद्धा आम्ही समीरच ठेवलय. आम्ही आता समीरचं बालपण पुन्हा जगू लागलोय. अगदी पहिल्या दिवसापासून आमच्या आयुष्यात अवर्णनीय आनंद देणाऱ्या डॉ.स्वाती मॅडम व त्यांची संपूर्ण टीम यांची मी मनःपूर्वक ऋणी राहीन. ईश्वराने त्यांना नेहमीच सुखी,आनंदी,निरोगी व समाधानी ठेवावे हीच त्याच्या चरणी प्रार्थना!! 

धन्यवाद!!!

                

                                                                                                                                                              शब्दांकन: डॉ. क्लिटा परेरा