Multiple follicle monitoring व IUI करूनदेखील आलेलं अपयश आणि अत्याधुनिक IVF तंत्रज्ञान वापरून झालेलं बाळ!!!
- Santati Fertility Center
- 16 July 2021
मी स्वतःच्या बाळाची कधी आई बनू शकेन का? मी आई होण्याचं सुख कधी अनुभवू शकेन का? असं असंख्य विचारांचं ओझं डोक्यावर घेऊन आलेली मी! मी श्यामल , गृहिणी आहे.माझे वय ३८ वर्ष आहे. माझ्या लग्नाला १२ वर्षे झालीत.लग्नानंतर मी नोकरी करत असल्याने ३-४ वर्षे बाळाचा विचार लांबवू असं आम्ही दोघांनी ठरवलं. ३-४ वर्षे कामात बऱ्यापैकी SETTLE झाल्यावर आपल्याला बाळाचा विचार करायला हवा असे आम्हां दोघांनाही वाटू लागले. व आता बाळासाठी प्रयत्न करायचा असे आम्ही ठरवले. महिन्यांमागून महिने जात होते. पाळी व्यवस्थित येत होती. पण बाळ मात्र राहत नव्हते. शेवटी डॉक्टरांचा सल्ला घेऊ असं आम्ही ठरवलं.
ठरल्याप्रमाणे एका प्रख्यात स्त्रीरोगतज्ञांकडे आम्ही गेलो. तो पर्यँत आमच्या लग्नाला जवळपास ७ वर्षे झाली होती. तेथील डॉक्टरांनी आम्हांला तुमचे सर्व रिपोर्ट करावे लागतील असे सांगितले. त्यांच्या सांगण्याप्रमाणे आमचे दोघांचे रिपोर्ट्स आम्ही केले. दोघांचेही रिपोर्ट्स नॉर्मल होते. तरीही बाळ काही राहत नव्हतं.आमची ट्रीटमेंट चालू केली गेली. दर महिन्याला FOLLICLE MONITORING केले जात होते . व प्रत्येक वेळी गर्भधारणा न राहिल्यामुळे आम्ही निराश होत होतो. म्हणता म्हणता एक वर्ष आम्ही FOLLICLE MONITORING करत होतो. पण काहीच उपयोग होत नव्हता. म्हणून डॉक्टरांनी आम्हला IUI करण्याचा सल्ला दिला. आम्हीदेखील त्यासाठी तयार झालो.आता आमच्या आशा अजून मजबूत झाल्या होत्या. IUI करून आपल्याला नक्कीच बाळ होईल असे आम्हांला मनोमन वाटत होते. आम्ही खूप काळजी घेत होतो. देवाचे नामस्मरण करत होतो. पण हे काय ? IUI करून देखील मला गर्भधारणा झाली नव्हती. नेहमीप्रमाणे मासिक पाळी सुरु झाली. मी आता पूर्णपणे खचून गेले होते. आम्ही डॉक्टरांना भेटलो, त्या म्हणाल्या आपण पुन्हा IUI करू . असे म्हणता म्हणता ३वेळा IUI केले. परंतु प्रत्येक वेळी पदरी निराशाच पडत होती. आता मात्र मी सगळेच HOPES सोडून दिले होते. सर्व काही ट्रीटमेंट बंद करून देवाच्या नावी सर्व सोडले होते. माझं कशातच आता मन रमत नव्हतं. सारखं एकाच गोष्टीचं डोक्यात TENSION असायचं. ''पण म्हणतात ना दुःखाच्या मागून सुखाचे दिवस येतात ''. तसंच माझ्या आयुष्यात हेच सुखाचे दिवस आले ते म्हणजे संतती फर्टीलिटी सेंटरमुळे मी एकदा त्याची नेटवर माहिती पाहिली व शेवटचा CHANCE म्हणून जायचे ठरवले.
आम्ही दोघेही डॉ.स्वाती मॅडम यांना भेटलो त्यांनी सर्व अत्याधुनिक रिपोर्ट्स करून आमच्या सगळ्या अडचणी शोधून काढल्या. त्या सगळ्या अडचणी दूर करून IVF तंत्रज्ञान वापरून माझ्या गर्भाशयात बाळ सोडण्यात आले. योग्य औषधपचारांनी माझी नॉर्मल डिलिव्हरी देखील झाली. आता माझी ७ महिन्याच्या दोन जुळ्या मुली आहेत. आमच्या आयुष्यात आनंद देणाऱ्या डॉ.स्वाती डोंगरे मॅडमची मी ऋणी आहे.
शब्दांकनः डॉ. क्लिटा परेरा.