Endometriosis व पाळीच्या वेळी असह्य पोटात दुखणे व त्यामुळे बाळ होण्यास येणारी अडचण !!
- Santati Fertility Center
- 21 June 2021
आई बनणे हे स्त्रीच्या आयुष्यातील अवर्णनीय आनंद देणारी गोष्ट आहे. माझा हा प्रवास इतका चढउतार देईल ह्याची मी कधी कल्पना देखील केली नव्हती.मी रीना. ६ वर्षांपूर्वी माझे व आशिषचे लग्न झाले. मला लग्नाच्या आधी पासूनच पाळीच्या वेळेस खूप पोटात दुखण्याचा त्रास होत होता. हा पाळीचा त्रास वाढतच चालला होता व इतका त्रास जाणवायचा की पूर्ण दिवस मला झोपूनच राहावे लागायचे. कॉलेज, जॉब, रोजची कामे काहीच करणे शक्य होत नव्हते. ह्यासाठी मी लग्नापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेतला. औषधांनी तेवढ्या पुरता आराम असायचा औषधं बंद केली कि पुन्हा त्रास वाढत जायचा.
एकदा लग्न झाल्यावर हा त्रास कमी होईल असे सर्वांकडून सांगण्यात येत होते. परंतु असे न घडता अगदी उलटेच झाले. माझा त्रास पूर्वीपेक्षा अजूनच जास्त वाढत गेला. व ह्यामुळे मला शारीरिक संबंध देखील ठेवणे अशक्य होऊ लागले. त्यावेळी देखील होणाऱ्या तीव्र वेदनेमुळे मी शारीरिक संबंध देखील टाळू लागले होते. परिणामी आमच्या दोघांमधील तणाव खूप वाढू लागला होता. वाद होऊ लागले होते. संबंध होतंच नसल्यामुळे बाळ कसे होईल हि चिंता मला सारखी सतवू लागली होती. बघता बघता ७ वर्षे उलटून गेली होती पण बाळाचा विचार काही पूर्ण होत नव्हता. मी ह्या त्रासामुळे अगदी हैराण झाले होते. काय करावे काहीच समजत नव्हते. आम्ही ह्या त्रासासाठी प्रख्यात डॉक्टरांची ट्रीटमेंट देखील घेतली. तरी काहीच फरक पडत नव्हता. आता मात्र माझी काळजी अजून जास्त वाढत चालली होती. हे असेच होत राहिले तर मी कधीच आई बनू शकत नाही व घरातील वातावरण पण अजून तणावग्रस्त होईल, ह्या विचाराने मी त्रस्त झाले होते. शेवटी मी इंटरनेटवर माझ्यासाठी योग्य स्त्रीरोगतज्ञांचा शोध घेत असताना मला संतती फर्टीलिटी सेंटर बदल समजले.बऱ्याच लोकांच्या सकारत्मक प्रतिक्रिया ऐकून आपण देखील संतती हॉस्पिटलला भेट द्यावी असे मी ठरवले.वेळ वाया न घालवता आम्ही दुसऱ्या दिवशी संतती फर्टीलिटी व IVF सेंटर मध्ये आलो. डॉ. स्वाती डोंगरे मॅडमना भेटून मी माझी संपूर्ण अडचण त्यांना सांगितली. त्यांनी माझे गरजेचे असलेले सर्व तपास करून घेतले. त्यानुसार माझ्या गर्भपिशवीमध्ये Endometriosis चे बरेच cyst होते. त्यामुळे हा सर्व त्रास होत होता. ह्यासाठी मॅडमनी माझी laparoscopy केली व त्यामुळे गर्भपिशवीत असलेले cyst जाळून टाकले. त्यामुळे menses चा होणार त्रास पूर्णपणे थांबला. तसेच शारीरिक संबंध देखील व्यवस्थित होऊ लागले. ह्या ट्रीटमेंट नंतर अगदी काही महिन्यातच मला नैसर्गिकरित्या गर्भधारणा झाली. कितीतरी वर्षांपासून होणार मासिक पाळीचा त्रास डॉ.स्वाती मॅडमच्या ट्रीटमेंटमुळे पूर्णपणे बरा झाला व मी अगदी सुंदर अशा बाळालादेखील जन्म दिला.
डॉ. स्वाती डोंगरे मॅडमनी केलेल्या उत्तम उपचारासाठी मी त्यांची खूप खूप आभारी आहे.
शब्दांकन : डॉ. क्लिटा परेरा.