Our Centers

Blog Details

वजन जास्त असल्यामुळे बाळ होण्याच्या प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी व अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून झालेलं बाळ !

              माझं शरीर माझी एवढी न आवडती गोष्ट बनेल असं स्वप्नातदेखील वाटलं नव्हतं !!!. हो! अगदी लहानपणापासून स्थूल अशी माझी शरीररचना. लग्नापर्यंत खात्यापित्या घरची लेक अशीच माझी झालेली ओळख त्यामुळे आपलं शरीर खूप वेगळं दिसतंय का याकडे माझं कधी लक्षचं गेला नाही. लग्नासाठी बघताना वजनामुळे थोड्या अडचणी आल्या पण मी उच्च शिक्षित, चांगल्या पगारावर जॉब करत असल्याने उत्तम घरात माझं लग्न करण्यात आलं.लग्नानंतरची ३-४ वर्षे नैसर्गिकरित्या बाळ होईल या आशेवर निघून गेली. परंतु बाळ काही राहत नव्हते. शेवटी घरातून बाळासाठी विचारणा सुरु झाली. आता मलाच राहवत नव्हते कारण माझे वय देखील तिशी पार करून गेले होते. शेवटी मी बाळासाठी ट्रीटमेंट घ्यावी असा निर्णय घेतला.

             ठरल्याप्रमाणे मी व माझे पती प्रख्यात स्त्रीरोगतज्ञांकडे गेलो. त्यांनी दोघांचे रिपोर्ट्स करून घेऊ असे सांगितले. दोघांचे रिपोर्ट्स पूर्णतः नॉर्मल होते. तरीही बाळ मात्र काही राहत नव्हते. दर महिन्याला माझी OVULATION STUDY  चालू होती. औषध गोळ्या सगळं काही करून देखील RESULT काही मिळत नव्हता. जिथे जाईन तिथे वजन कमी कर मगच तुला बाळ होईल असेल सांगितले जात. वजन कमी करण्यासाठी देखील माझे अतोनात प्रयत्न सुरु होते. मी नेट वर पाहून विविध DIET FOLLOW करत होते,व्यायाम करत होते. परंतु काहीच फायदा होत नव्हता. वजन मात्र काही केल्या कमी होत नव्हते. मला देखील वजनामुळे बाळ होत नाही हे ऐकुन-ऐकुन स्वतःच्या शरीराची अगदी चीड येऊ लागली होती. स्वतःबद्दलचा आत्मविश्वास दिवसेंदिवस कमी होत चालला होता. आता अगदी माझ्या पतीकडून देखील टोमणे सुरु झाले होते. घरात खूप खटके उडू लागले होते. जीवन अगदी नकोस झालं होतं.

            एकेदिवशी ऑफिसमध्ये मैत्रिणीकडून संतती टेस्टट्युब बेबी व फर्टीलिटी सेंटरबद्दल समजले. तिने आग्रहानेच तू एकदा VISIT करून ये असे सांगितले. ठरल्याप्रमाणे  मी व माझे पती संतती टेस्टट्युब बेबी व फर्टीलिटी सेंटरला आलो. प्रवेश करताच सर्वत्र लावलेले बाळांचे फोटो पाहून आम्हांला खूप सकारत्मक वाटले. शेवटी डॉ.स्वाती डोंगरे मॅडमना भेटलो. त्यांना मी सुरुवातीलाच माझ्या वजनामुळे बाळ होत नाही असे सांगितले. मॅडम यांनी अगदी प्रेमाने व आपुलकीने मला म्हणाल्या कि ४० किलो वजनाची बाई देखील आई होते व १०० किलो वजनाची बाई देखील आई  होते. हे ऐकून खूपच सकारत्मक वाटले. त्याच दिवसापासून माझी ट्रीटमेंट सुरु करण्यात आली. मॅडमनी मला योग्य DIET CHART देऊन, काय काय व्यायाम करावा याचे उत्तम मार्गदर्शन केले. व त्याला औषधांची जोड होती. बघता बघता अगदी ४-५ महिन्यांमध्ये माझे ८-९ किलो वजन कमी झाले व त्यानंतर IVF तंत्रज्ञानाद्वारे माझ्या गर्भाशयात बाळ सोडण्यात आले. गर्भावस्थेतदेखील मॅडमने मला उत्कृष्ट मार्गदर्शन करून माझी नॉर्मल डिलिव्हरी केली. आता माझी मुलगी २ वर्षाची आहे.

             माझ्या आयुष्यात आनंद पसरवणाऱ्या डॉ.स्वाती डोंगरे मॅडम व संपूर्ण टीम ची मी ऋणी आहे.

 

                                                                                                                                                             

                                                                                                                                                                                      शब्दांकन: डॉ. क्लिटा परेरा.