Our Centers

Blog Details

PCOS मुळे मला झालेला त्रास , व त्यावर मात करून मला झालेलं बाळ!

 

         मला PCOS झालयं ? व त्यामुळेच मला बाळ होत नाहीये ?काय आहे हा PCOS आजार ? नेहमीचीच सकाळ! पण आज मनात मात्र वेगळ्या विचारांनी थैमान घातलंय !

      सकाळची ऑफिसला जायची घाई, घरातच कामाची लगबग !त्यातचं सासूबाईंच्या बोचक्या शब्दातील टोमणा कानावर पडला.``पैसे तर कमवशील गं !" पण लग्नाला ७ वर्षे झालीत. वंशाचा दिवा कधी देणार??? तुम्हा शिकलेल्या मुलींना आजकाल मूलचं नको असतात पण आमचं काय ?? आम्हांला नातवंड पाहिजे आहे मी मुकाट्याने सर्व काही ऐकत होते.पण उत्तर काय द्यावे काहीच सुचेना.तशीच सर्व काही काम आवरून ऑफिसला निघाले. पण कामातही आज बिलकुल लक्ष लागत नव्हत.सर्व काम बाजूला ठेवून मी दीर्घ विचारात गेले. खरचं आम्हांला बाळ नको आहे का ?(उत्तर' नाहीचं' होते) आम्हालाही अगदी सासूबाई एवढीच ओढ लागली होती. प्रयत्न तर चालू होते. पण प्रत्येक महिन्याला निराशाच पदरी पडत होती. दोन मिनिटं अगदी स्वतःच्या विचारात गेले !अरे !!मी किती बदलली आहे? माझं वजन का भराभर वाढतंय? चेहऱ्यावर अनावश्यक केस येतायत. त्वचा पण काळवंडतेय ,चिडचिड पण फार होत चालली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझी पाळी का नियमित येत नाहीये ? काय झालयं मला ?      कसंबसं ऑफिसचं काम आवरून घरी परतले. सासूबाईंचा सकाळचा मूड अजूनही तसाच होता. मनातलं दुःख बाजूला ठेवून दुसऱ्या दिवशी डॉक्टरांना भेटूनच काय ते स्पष्ट करून घ्यायाचं ठरले. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे डॉक्टरांना भेटले. डॉक्टरांनी सोनोग्राफी करून घेऊ सांगितले. रिपोर्टमध्ये तुम्हांला PCOS आहे असे सांगण्यात आले. PCOS बद्दल मैत्रिणी-सहकारी यांच्याकडून बरेच ऐकण्यात आले होते. बाकी कोणत्याच गोष्टीचे जास्त टेन्शन आले नव्हते मात्र मला बाळ होणार नाही का ?हेच विचार मनात घोळत होते. मन सुन्न झाले होते.अगदी दुसऱ्याच दिवशी प्रख्यात स्त्रीरोगतज्ञांकडे धाव घेतली. त्यांनाही रिपोर्ट्स दाखवले. तेव्हा पासून औषध उपचार सुरु झाले. व्यायाम, आहारातील बदल सर्व काही सांगितल्याप्रमाणे करत होते. परिणाम मात्र फारसा काही जाणवत नव्हता. म्हणून म्हणता म्हणता अजून १ वर्ष उलटले होते. आता मात्र घरातून अजूनच टोमणे ऐकू येऊ लागले होत. ''एवढा औषध उपचारात पैसा घालतेस तरी का बाळ होत नाही आहे?'' आता मात्र माझाही संयम सुटत चालला होता. शारीरिक होणारा त्रास व त्यात भर म्हणून मानसिक ताण. अगदी नकोसं झालं होत, सतत च्या मानसिक तणावामुळे ऑफिसचे कामही व्यवस्थित होत नव्हते. त्यामुळे तिथून देखील बऱ्याच तक्रारी येऊ लागल्या होत्या. माझं बेढप झालेलं शरीर, निस्तेज चेहरा, दुःखी मन यामुळे माझा आत्मविश्वास दिवसेंदिवस कमी होत चालला होता. यातच एक दिवस मला संतती फर्टीलिटी व IVF सेंटर बद्दल कळले. शेवटचा पर्याय म्हणून येथे जाऊन यावे असे ठरलं. सर्व फाइल्ससह आम्ही दोघं डॉ. स्वाती डोंगरे मॅडमडॉ. अतुल डोंगरे सर यांना भेटलो. डॉक्टरांच्या सकारात्मक बोलण्याने पुन्हा एकदा मावळलेली आशा जागवली गेली. त्याच दिवसापासून माझी TREATMENT सुरु करण्यात आली. अगदी २-३ महिन्यांमध्ये मला गर्भधारणा झाली. आज मी अगदी गोंडस अशा २ वर्षाच्या मुलीची आई आहे . बाळाच्या येण्याने घरातील सर्वच वातावरण बदलून गेले, मी देखील आता खूप आनंदी व उत्साही बनले.आमच्या  घरामध्ये आनंद पसरवणाऱ्या डॉ.स्वाती मॅडम व डॉ.अतुल सर आणि संपूर्ण टीम यांचे मी मनापासून आभार मानते.

 शब्दांकन: डॉ. क्लिटा परेरा